मुंबई : गेल्या सात ते आठ सरकारी खात्यांमध्ये नोकरभरती न झाल्यामुळे सध्या राज्य सरकारच्या विध प्रशासकीय विभागात अडीच लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेकर कमालीचा ताण पडला आहे, असे पत्र महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱयांच्या निवृत्तीचे वय 60 करण्याच्या मागणीसाठी महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये रिक्त पदांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. दरवर्षी असंख्य कर्मचारी निवृत्त होतात. त्यामुळे तीन टक्के पदे रिक्त होतात. पण गेल्या काही वर्षात नोकरभरती झालेली नसल्याने मोठय़ा संख्येने पदे रिक्त राहिली आहेत. त्यामुळे राज्यातील तरुण बेरोजगारांना नोकरीची संधी मिळालेली नाही. परिणामी रिक्त जागा भरण्यासाठी नियुक्तीची प्रक्रिया युद्धपातळीकर राबवण्याची मागणी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई व सरचिटणीस विनायक लहाडे यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment